संस्कार शिबीर – २०१६
रत्नागिरी येथील श्री. गजानन महाराज मंदिरामध्ये दि. २० एप्रिल ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत १२ वर्षापर्यताच्या विनामूल्य संस्कार शिबीर घेण्यात आले. सदर शिबिर रोज सांयकाळी ४ ते ६ या वेळेत मंदिरामध्ये घेण्यात आले असून त्यात ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. मकरंद दामले यांनी मुलांना संस्कृत सुभाषिते, प्रातस्मरण, सायंप्रार्थना, गीतेचा १२ वा अध्याय शिकवून त्याचे पाठांतर करून घेतले. सौ. गोगटे, सौ नेने ,सौ. केळकर , सौ. मुळ्ये, सौ. बोडस, सौ. रानडे यांनी मुलाना बोधकथा सांगितल्या तसेच बडबडगीते, खेळ व नमस्कार शिकविले . अशा शिबिरांचे आयोजन सुट्टीप्रमाणे दरमहा करण्यात यावे असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले. शिबिराच्या समारोपाच्या प्रमुख पाहुण्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या सौ. जामखेडेकर असून जिल्हा न्यायाधीश श्री. देशपांडे यांनीही शिबिराला सपत्नीक भेट दिली. पाहुण्याच्या हस्ते मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी अध्यक्ष श्री. म. वा. देसाई यांचे आभार मानले .

