श्री गजानन महाराज प्रकटदिन

प्रगटदिन उत्सव :-

  • तीन दिवस प्रगटदिन उत्सव – यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, श्रीदासगणूविचरित विजय ग्रंथाचे पारायण, याग, श्रींवर भक्तांचे अभिषेक, महाप्रसाद वगैरे कार्यक्रम असतात. रात्रौ मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते.
  • मंदिराचे बांधकाम सुरु होण्यापूर्वीच्या कालखंडात प्रगट दिनाच्या दिवशी मंदिरात गायनाचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यांमध्ये सौ. शशिकला अभ्यंकर, सौ.सरोज देसाई, सौ.अनुया बाम, कु. संध्या सुर्वे, श्री आनंद प्रभुदेसाई यांनी भाग घेतला होता.
  • मंदिरात दरवर्षी प्रगटदिनाला महिलांची व पुरुषांची भजने घेतली जातात. यामध्ये रत्नागिरी येथील श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ, पावस येथील बागेश्री महिला मंडळ तसेच टिके येथील श्रीराम भजनीमंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ यांनी भाग घेतला आहे.

प्रगटदिन - २०१५