स्वामी स्वरूपानंद पालखी

पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंदांची पालखी दरवर्षी कोल्हापूर येथील श्री माने हे पंढरपूर वारीसाठी नेतात. सोबत कोल्हापूर व रत्नागिरी येथील स्वामीभक्त असतात. ही वारी पंढरपूर पर्यंत पायी जाते. सुमारे २४ दिवसात प्रवास होतो व एक रात्र या मंदिरात राहतात त्यावेळी अनेक स्वामीभक्त पालखीचे दर्शन घेतात व पालखी नाचवून, फेर धरून अनेक भजने म्हटली जातात.