भागवत सप्ताह
महर्षी व्यास यांनी रचलेला हा भागवत ग्रंथ शुकमुनींनी परिक्षित राजाला प्रथम शुकताल येथील आश्रमात सांगितला सदर ग्रंथ सात दिवसात पूर्ण करण्याची प्रथा आहे म्हणून त्याला संगीत भागवत सप्ताह म्हणतात. या मंदिरात प्रथम सौ. शैलजा रानडे व नंतर श्री. राघवेंद्रस्वामी रामदासी यांनी संपन्न केला. अनेक कृष्ण लीला ऐकताना भक्तसमुदाय भक्तीमय झाला होता. गोवर्धन पर्वत, कृष्णजन्म, रुक्मिणी स्वयंवर वगैरे प्रसंगरूपाने सादर करण्यात आले.

