कीर्तन प्रशिक्षण शिबीर

रत्नागिरी येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे नारदीय कीर्तनाचे प्रशिक्षण शिबीर नागपूर येथील कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दिलीप डबीर व त्यांचे सहकारी ह.भ.प. श्री. आदित्य देशकर यांचे मार्गदर्शनाखाली दि. १५-११-२०१५ ते दि. २२-११-२०१५ या कालावधीत घेण्यात आले. या शिबिरात १५ प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता. सदर शिबिराचा शुभारंभ जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री. नाना जोशी तर समारोप गोगटे कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांचे हस्ते संपन्न झाला. मंदिरामार्फात कीर्तन प्रशिक्षण शिबीर घेण्याचा उपक्रम रत्नागिरीत प्रथमच करण्यात आला. समाजातून सदर उपक्रमाला चांगला पाठींबा मिळाला. राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि समाजप्रबोधन करण्यासाठी कीर्तन हे माध्यम विशेष उपयुक्त ठरत आहे.

preloader
1
2
3
4
5
28
29
14
23
22
21
16
20
6
7
8
27
9
10
11
12
13
17
18
19
25
15

Comments are closed.