प्रकटदिन सोहळा २०२२

                   श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा २३-०२-२०२२ ते २६-०२-२०२२ या मुदतीत मंदिरात संपन्न झाला .यावर्षी शतचंडी याग करण्यात आला व त्या संदर्भात डोंबिवली येथील सौ. स्नेहल संतोष पित्रे यांची दोन कीर्तने करण्यात आली .बहुसंख्य लोकांनी कीर्तन श्रवणाचा , दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला .तसेच कुमारी पूर्वा खारगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कत्थक नृत्य करून लोकांची वाहवा मिळवली . मोठे देणगीदार व कार्यकर्ते यांचा सायंकाळी सत्कार कृतज्ञता समारंभ संपन्न झाला . त्यावेळी सौ.शिल्पा पटवर्धन या समारंभाच्या अध्यक्ष होत्या. दोन दिवस पालखी प्रदक्षिणा भक्तगणांच्या उत्साहात संपन्न झाली . त्यातील काही क्षणचित्रे खालील प्रमाणे :

Comments are closed.