श्रीराम नवमी

श्रीराम जन्मोत्सव :-

चैत्र शु. नवमीला श्री रामजन्म होतो. श्री गजानन महाराज हेही रामभक्त होते. शेगाव येथील त्यांच्या मंदिरात राममंदिर आहे . आमच्या मंदिरात दुपारी रामजन्माचे कीर्तन केले जाते व फुलांनी सजवलेला पाळणा बांधून त्यामध्ये रामजन्म करून पाळणा म्हटला जातो. व भक्तांना दुपारी महाप्रसाद देण्यात येतो.