८१ वा वाढदिवस अभिष्टचिंतन व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

 

श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री.म.वा.देसाई यांच्या वयाला दि.१२ जानेवारी २०२४ रोजी ८१ वर्षे पूर्ण झाल्यामुळे गजानन भक्तांनी मंदिरामध्ये त्यांना पंचारती ओवाळून,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यावेळी त्यांनी मंदिरातील पावित्र्याबद्दल व सतत चालणाऱ्या उपासनेबद्दल समाधान व्यक्त करुन भक्तांमुळे या मंदिराचा रत्नागिरीमध्ये विशेष उल्लेख केला जात असल्याचे सांगितले.व याचे सर्व श्रेय सर्व उपस्थितांचे असुन त्यांच्यावतीने मी हा सत्कार स्वीकारतो असे सांगितले.

Comments are closed.